Skip to main content

भारतात इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार

          

      जम्मू-काश्मीरमध्ये लिथियम धातूचे साठे सापडले आहेत.  हरितऊर्जा धोरणाच्या (Green Energy Policy) यशस्वितेसाठी आवश्यक अशा ई-वाहनांच्या (Electric Vehicle) बॅटरीमध्ये या धातूचा महत्त्वाचा भाग असतो. या साठ्यांचे प्रमाण बरेच मोठे, म्हणजे तब्बल ५९ लाख टन आहे. 

          ‘खाण आणि खनिजे (विकास व खनन) कायदा, १९५७’ अन्वये खाणीतून काढण्यात येणाऱ्या कच्च्या मालापासून ते शुद्ध धातू मिळविण्यापर्यंतच्या प्रक्रियेचे चार टप्पे असतात. 

1️⃣ पहिला टप्पा : धातूसाठी (metal) केली जाणारी पाहणी

2️⃣ दुसरा टप्पा : प्राथमिक उत्खनन (Primary Excavation)

3️⃣ तिसरा टप्पा : सर्वसाधारण उत्खनन (General Excavation)

4️⃣ चौथा टप्पा : सखोल उत्खनन (Deep Excavation)


             काश्मीरमध्ये सापडलेला साठा हा दुसरा टप्प्यात 2️⃣ आहे. त्यामुळे आणखी दोन टप्पे पार पडल्यानंतरच या साठ्यापैकी प्रत्यक्षात किती साठा शुद्ध लिथियमची निर्मिती करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, हे समजणार आहे. 
             लिथियम साठा ‘प्राथमिक अन्वेषण टप्पा [Preliminary Exploration Stage (G-3)]’ या दर्जाचा आहे. 


लिथियमचे महत्त्व

💻 लिथियम हा धातू प्रामुख्याने मोबाइल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनातील बॅटरीचा महत्त्वाचा घटक आहे. 

🔋 सध्या सर्व जगभर हरितऊर्जेचा (Green Energy) बोलबाला आहे. 

⛽ पारंपरिक इंधनांचे साठे (conventional fuel) संपुष्टात आल्यानंतर अपारंपरिक ऊर्जास्रोतांकडे (Non Conventional Energy Source) वळावे लागणार आहे. 

🚗 इलेक्ट्रिक वाहनांची संख्या भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. 

📱मोबाइल प्रत्येक व्यक्तीसाठी जीवनावश्यक वस्तू झाली आहे. 

📲 त्यामुळे मोबाइलच्या बॅटऱ्यांमध्येही संशोधन सुरू असून, जास्त काळ टिकणाऱ्या बॅटऱ्या तयार करण्यावर भर दिला जात आहे.

🍸 याशिवाय याशिवाय काचेच्या वस्तू आणि सिरॅमिक वस्तू यामध्येही तापमानरोधक आणि कठीणपणासाठी लिथियमचा वापर होतो.

🆒 उष्णतारोधक ग्रीस आणि वंगण (Lubricant) यातही लिथियम धातूची आवश्यकता असते. 

🏗️ॲल्युमिनिअम आणि तांब्याबरोबर त्याचे मिश्रण करून बांधकामांतही त्याचा वापर केला जातो. 

🏥 वैद्यकीय क्षेत्रातही लिथियमचा वापर काही ठिकाणी केला जातो.

💊 मानसोपचारांतील काही औषधांमध्ये, तर सिरॅमिकच्या दातांमध्येही लिथियमचा उपयोग करण्यात येतो.

💣 अण्वस्त्रांमध्येही लिथियमची उपयुक्तता आहे. 

⚛️ लिथियमच्या ‘लिथियम सहा’ या समस्थानिकाचा वापर ट्रिटियमच्या उत्पादनासाठी केला जातो. 

☢️ ट्रिटियमचा वापर अण्वस्त्रनिर्मितीसाठी (Nuclear weapons) केला जातो.



काश्मीरमधील साठा नक्की कुठे?

         ‘Geological Serve of India' (GSI) जम्मू-काश्मीरमधील रिसाई जिल्ह्यातील सलाल-हैमाना परिसरात हा लिथियम साठा आढळला आहे. रिसाई जिल्हा मुख्यालयापासून २३ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. हा सर्व परिसर डोंगराळ आहे. केंद्रीय खनिज मंत्रालयाने ही माहिती दिली. 

          या परिसरात एक माध्यमिक शाळा आणि रिसाई ते महोरला जोडणारा रस्ता आहे. याशिवाय ५० ते ६० घरे आहेत. जवळूनच चिनाब नदीही वाहते. अहमद यांच्या मते, या ठिकाणी कुंपण घालण्याची आवश्यकता आहे आणि येथील लोकांचे स्थलांतरही करावे लागू शकते.

 


लिथियमचा साठा किती? 

🛢️आतापर्यंत लिथियम व सोन्याच्या साठ्याचे ५१ गट सापडले आहेत. 

🪙 5 गट सोन्याचे (Gold) तर, उर्वरित पोटॅश (Potash), मॉलिब्डेनम (Molybdenum) या धातूंचे आहेत. 

‘GSI’ ने आणखी १५ खनिजसमृद्ध (mineral rich) भागांची यादी संबंधित राज्यांकडे ९ फेब्रुवारी रोजी दिली आहे. 

रिसाईचे जिल्हा खाण अधिकारी शफीक अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात आढळलेल्या खनिजसाठ्यांत सर्वांत आधी बॉक्साइट (bauxite) आढळले. 

पुढील पाहणीत तेथे लिथियम (Lithium), टिटॅनियम (Titanium) व अॅल्युमिनियम (Aluminium) आढळले. 

त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण लिथियमचे आहे. 


जगात कुठे किती लिथियम?

1️⃣ जगात लिथियमचा सर्वाधिक साठा चिली देशात आढळतो. तेथे तब्बल 92 लाख टन (9.2 million tonnes) एवढा लिथियमचा साठा आहे. 

2️⃣ ऑस्ट्रेलियात (Australia) 57 लाख टन (5.7 million tonnes) लिथियमचे साठे आहेत. 

🆕 भारत लिथियमची सर्वाधिक आयात ऑस्ट्रेलियाकडूनच करतो.

     "काश्मीरमध्ये सापडलेल्या साठ्याचे प्रमाण आत्ता तरी ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त, म्हणजे ५९ लाख टन (5.9 million tonnes) एवढे दिसते आहे.

3️⃣ अर्जेंटिनात २२ लाख टन (2.2 million tonnes)

4️⃣ पोर्तुगालमध्ये १५ लाख टन (1.5 million tonnes)

5️⃣ चीनमध्ये १५ लाख टन (1.5 million tonnes)

6️⃣ अमेरिकेत ७.५ लाख टन (7.5 million tonnes) 



        या साठ्याचा खरोखर जास्तीत जास्त शुद्ध धातूनिर्मितीसाठी उपयोग झाला तर देशाच्या आर्थिक स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. 






NILESH BOCHARE 
BE, SGBAU
AI, University of Helsinki, Finland 
 Tutor | Engineer | Tech Advisor 

👷 JEE 👨‍⚕️NEET 👩‍💼 MHT-CET