Skip to main content

10 वी व 12 वी परीक्षा NEP नुसार


10 वी-12 वीची परीक्षा NEP नुसार? बोर्डाकडून आले स्पष्टीकरण 


        "राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार असून, त्यांच्या परीक्षा पद्धतीत बदल होणार आहे.  मात्र, हा बदल लागू होण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने होतील", असे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

गोसावी म्हणाले, ‘सध्या राज्य मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार परीक्षा होणार. येत्या शैक्षणिक वर्षापासून बदल लागू होणार नाही.'

त्याशिवाय पाचवी आणि आठवीच्याही परीक्षा घेण्याबाबत नमूद केलेले आहे. 


आता वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा 

आतापर्यंत 10 वी आणि 12 वीला वार्षिक बोर्ड परीक्षा देता येत होती.  10+2+3 वर्षे अशा शिक्षणाच्या पॅटर्नमध्ये आता नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत बदल होणार आहे. त्यानुसार यापुढं वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा होणार आहे. 2024 पासून केंद्र सरकार नवे शैक्षणिक धोरण लागू करणार आहे.

11 वी आणि 12 वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता विषय निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे. विद्यार्थ्यांना 2 भाषांचा अभ्यास करता येईल. यामध्ये एक भारतीय भाषा असेल. यासाठी नवा अभ्यासक्रम तयार केली जात आहे. 

परीक्षा पद्धती 

एकूण प्रमाणीकरणात कामगिरीवर आधारित मूल्यांकनावर 75 टक्के आणि लेखी परीक्षेवर 25 टक्के भर दिला जाणार आहे. विज्ञान आणि इतर विषयांचे कामगिरीवर आधारित म्हणजेच प्रयोगाशी जोडलेले असेल. 
विषयाच्या प्रमाणीकरणात त्याला 20 ते 25 टक्के महत्त्व असायला हवे. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हायला मदत होणार आहे. 


बोर्डाना आदेश

Semister (नियतकालिक) पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश महाराष्ट्र, दिल्ली, सीबीएसईसह सर्वच बोर्डांना देण्यात आले आहेत. 

NEP 2024 पासून 

New Education Policy नुसार केंद्र सरकारनं शिक्षण धोरणात हे महत्त्वाचे बदल केले आहेत. याची तात्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2024 पासून राष्ट्रीय शिक्षा धोरण 2020 विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

Read : NEP 2020





NILESH BOCHARE 
BE, SGBAU
AI, University of Helsinki, Finland 
 Tutor | Engineer | Tech Advisor 

👷 JEE 👨‍⚕️NEET 👩‍💼 MHT-CET