Skip to main content

यशोगाथा 1 - हेल्मेट किंग

🔰 Home     Success Story 

यशोगाथा 

उद्योजक भाग 1 : हेल्मेट किंग

            भारतातील अनेक मोठ्या उद्योगपतींच्या यशोगाथा आज लाखो तरुणांना प्रेरणा देत आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक तरुणांनी नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि आज ते लाखो लोकांना रोजगार देत आहेत.  
            आजच्या भागामध्ये यशोगाथा 'Steel Bird' कंपनीचे MD राजीव कपूर यांची. 


          राजीव कपूर यांनी आपला व्यवसाय अशा वेळी सुरू केला जेव्हा कोणताही उद्योग सुरू करणं सोपं काम नव्हतं. 

         'Steel Bird' हेल्मेटच्या जगात हे एक प्रसिद्ध नाव आहे. उत्कृष्ट उत्पादनाच्या गुणवत्तेमुळे 'Steel Bird' हेल्मेट ही आशियातील No. 1 कंपनी बनली आहे. 

          देशात हेल्मेट किंग म्हणून ओळखले जाणारे स्टीलबर्डचे MD राजीव कपूर यांनी कठोर परिश्रमातून 554 कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. 

 बालपण  

         राजीव कपूर यांचा व्यवसायाचा प्रवास लहानपणापासूनच सुरू झाला. शाळेतून वेळ मिळाल्यानंतर ते आपल्या वडिलांसोबत कारखान्यात जायचे. यावेळी त्यांचे वडील त्यांना कारखान्यात हेल्मेट कसे बनवतात हे सांगायचे आणि त्याची माहिती द्यायचे. 


 महाविद्यालय 

          राजीव कपूर कामात गुंतले आणि कॉलेजचं शिक्षणही सुरू ठेवलं. राजीव कपूर प्रत्येक कामाला आव्हान म्हणून घ्यायचे. वडील त्यांना कामात निष्णात बनवत होते. 


 21 कोटींचे नुकसान ते ₹ 554 कोटीची कंपनी 

          2002 मध्ये कंपनीच्या मायापुरी युनिटमध्ये भीषण आग लागली. ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशी ते 4 कोटी रुपयांचा माल निर्यात करणार होते. पण या आगीत सर्व काही उद्ध्वस्त झालं. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, त्यावेळी राजीव कपूर यांनी कंपनीचा विस्तार करण्यासाठी ₹ 21 कोटी कर्जही घेतलं होतं. 

          मात्र, कठीण परिस्थितीतही राजीव कपूर यांनी मागे वळून पाहिलं नाही आणि कठोर परिश्रम सुरूच ठेवले. त्याचाच परिणाम म्हणजे आज 'Steel Bird' कंपनी सतत प्रगती करत आहे. देशात हेल्मेट किंग म्हणून ओळखले जाणारे स्टीलबर्डचे MD राजीव कपूर यांनी कठोर परिश्रमातून 554 कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. 


अधिक वाचा
✓ मोबाईल मध्ये इमर्जेंसी अलर्ट Click here.

✓ 10 वी व 12 वी परीक्षा NEP नुसार Click here.

✓ भारतात इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार Click here.

✓ National Education Policy 2020 Click here.









NILESH BOCHARE 
BE, SGBAU
AI, University of Helsinki, Finland 
 Tutor | Engineer | Tech Advisor 

👷 JEE 👨‍⚕️NEET 👩‍💼 MHT-CET